
शिरोळ / प्रतिनिधी
सध्या राज्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय झाल्यामुळे शेती करणे व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य झाले आहे. हंगाम २०२४-२५ साखर कारखान्यांनी ३ हजार रुपयांच्या आसपास दर जाहीर केलेला आहे तो शेतकऱ्यांना परवडणारा नाही.संघटनांनी सध्याच्या साखरेच्या दराच्या हिशोबाने मागणी केलेला दर ३ हजार ७००रुपये मागील २०० रुपये साठी उपोषण धरणे आंदोलन करून सुद्धा कारखान्यांनी व शासनाने याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही त्यामुळे आत्ता वाढलेल्या महागाईचा विचार करता किमान ५ हजार प्रती टन दर मिळाला पाहिजे त्यासाठी मिळण्यासाठी साखरेची एम एस पी प्रति किलो ५० रुपये करावी अन्यथा राज्य व केंद्र शासनाने शेतकऱ्यांना प्रति टन १५०० रुपये अनुदान द्यावे अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेचे तालुका अध्यक्ष दिपक पाटील यांनी आज सोमवार दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता केली शिरोळ येथे केली आहे.यावेळी दिपक पाटील पुढे म्हणाले सध्या राज्यात दुधाला दर नसल्यामुळे शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय अडचणीत आलेला आहे त्यामुळे गाईचा दूध दर किमान ५० रुपये म्हशीचा दूध दर किमान ७० रुपये प्रति लिटर करावा,त्याचप्रमाणे गेली दहा वर्षे शेतीमालाचे भाव सरकारने वेळोवेळी निर्यात बंदी,बाजार बंदी लादुन नियंत्रित ठेवले आहेत.त्यामुळे शेती व्यवसाय तोट्यात गेला आहे.त्यामुळे राज्य शासनाने सत्तेवर येण्यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे कर्जमाफी देऊन शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा.शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी हॉर्स पावरचे निकष न लावता सरसकट विज बिल माफ झाले पाहिजे,वरील मागण्या सरकारने मान्य करून अंमलबजावणी करावी अन्यथा 26 जानेवारी पासून तीव्र आंदोलन केले जाईल असे आशयाचे निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकारी व साखर संचालक विभाग कोल्हापूर यांना देण्यात आले यावेळी सुदीप पाटील, संपत मोडके, संभाजी माने इत्यादी शेतकरी उपस्थित होते.