शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यात शासनाचा नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर वाळू उपशा केला जात होता यावर आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्याकडे लेखी व तोंडी तक्रार करूनही तहसीलदार हेळकर यांनी दुर्लक्ष केल्याने कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांची तक्रार करणार असल्याचे निवेदन शुक्रवारी दिनांक 27 डिसेंबर रोजी शिरोळ तहसील कार्यालयास आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने देण्यात आले होते.अंकुशच्या निवेदनाची दखल घेऊन आज सोमवार दिनांक 30 डिसेंबर रोजी शिरोळ तालुक्यातील सर्वच वाळू उपसा करणारी यंत्रणा बंद ठेवण्यात आला आहे.आज आंदोलन अंकुश संघटनेच्या दणक्याने शिरोळ महसूल प्रशासन जागे झाले असले तरी येत्या काळात बेकायदेशीर वाळू उपसा झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात येईल अशी प्रतिक्रिया आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी आज सोमवार दिनांक 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता दिली आहे.आंदोलन अंकुश यांनी बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर अंकुश ठेवल्याने शिरोळ तालुक्यातून आंदोलन अंकुश संघटनेचे कौतुक केले जात आहे.शिरोळ तालुक्यात वाळू माफियांविरोधात आंदोलन अंकुश संघटना आक्रमक झाल्याने वाळू माफिया यांच्यात अस्वस्थता पसरली आहे.त्यामुळे येत्या काळात कायदेशीर मार्गानेच वाळू उपसा करावा लागणार असल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.वाळू उपशाबाबत आंदोलन अंकुश संघटना आक्रमक झाल्याने येत्या काळात कायदेशीर मार्गाने वाळू उपसा करावा लागणार असल्याने वाळू व्यवसायिकात अस्वस्थता पसरली आहे.