अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या नराधमांला फाशी द्या मनसेची मागणी

Spread the love
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहरातील मनसेच्या वतीने राजगुरुनगर येथे अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या नराधमांला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीचे निवेदन आज प्रांत अधिकारी यांना देण्यात आले यावेळी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
राजगुरुनगर येथे दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक शोषण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.सदरचे निवेदन नायब तहसिलदार संजय काटकर यांना

देण्यात आले.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राजगुरुनगर जिल्हा पुणे येथे मकवाने गोसावी समाज कुटुंबातील दोन सख्या बहिणीचे अजय दास या परप्रांतीय नराधमाने लैंगिक शोषण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती हे कुटुंबीय भटके विमुक्त जाती व जमाती गोसावी समाजाचा असून सदरील कुटुंबीय पोट भरण्यासाठी परगावी मोल मजुरी करण्यासाठी गेलेले आहे.या मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांला फाशीची शिक्षा मिळावी,सदरची केस फास्ट ट्रक कोर्टात चालवून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी इचलकरंजी मनसेचे वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी  मनसे शहर अध्यक्ष रवी गोंदकर,प्रतापराव पाटील,मनोहर जोशी,नितीन कटके, महेश शेंडे रोहित कोटकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते

error: Content is protected !!