इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहरात असणाऱ्या कलानगर परिसरातील सुर्वे नगर गल्ली नंबर दोन मध्ये केसरवानी हा परिवार आपल्या कुटुंबासह राहण्यास आहेत.सत्यम केसरवाणी याचे गेल्या पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते.मुलगी लग्नापूर्वी आण्णाराम गोंडा शाळेजवळ आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. सत्यम व निकिताचा पाच वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता.विवाह झाल्यानंतर सत्यम व त्याचे आई-वडील निकिताकडे वारंवार पैशाची मागणी करत होते.निकिताच्या आई-वडिलांनी जावयाला पैसेही दिले होते,पण तरीसुद्धा निकिताला पती सासू-सासरे वारंवार तिला मानसिक छळ करून तिला मारहाण करत होते ते सुद्धा ती सहन करत होती.निकिताला दोन वर्षाचा मुलगा आहे.तसेच ती पाच महिन्याची गरोदर आहे याची दखल सासरे पती करत नव्हते तसेच तिला मारहाण करत होते काल सुद्धा आईवडिलांकडून पैसे आन अशी मागणी करून तिला मारहाण केली व तिला खोलीत बंद केले होते याचाच मनात राग धरून निकिता हिने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.याची माहिती पतीला कळताच पतीने मृतदेह खाली काडून घेतला याची माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी पंचनामा करून निकिताचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.दरम्यान निकिताच्या आई-वडिलांनी आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा छळ करून तिला मारण्यात आले आहे असा आरोप निकिताच्या आई-वडील व तिच्या भाऊ व मित्रपरिवारने केला आहे याची दाखल घेत शिवाजीनगर पोलिसांनी सत्यम केसरवानी व त्याचे वडील भाऊ यांना सध्या चौकीसाठी ताब्यात घेतले आहे.एखाद्या मुलीचा छळ करून मारहाण होत असेल तर सध्या अजून महाराष्ट्र कुठे आहे असा सवाल सध्या निर्माण झाला आहे अजूनही हुंड्याची संस्कृती बंद झाली नाही का?अश्या सासू-सासरे पतीवर कठोर करावी करण्याची मागणी सध्या समाज माध्यमातून होऊ लागली आहे जर त्यांच्यावर कठोर कारवाई नाही झाली तर केसरवानी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समस्त केसरवानी समाजाने दिला आहे.या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहेत.