सर्पमित्र प्रविण खांडेकर यांने अजगर सापाला दिलं जीवदान

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

शिरोली पुलाची (करवीर वन परिक्षेत्र)येथे महाडिक पंपा जवळ स्टील गोडाऊन मध्ये सर्पमित्र प्रविण खांडेकर यांनी मध्यम लांबीच्या अजगर (Indian Rock Python) जातीच्या सापाची सुखरूप सुटका केली.सदर साप बिनविषारी असल्याने त्या सापा बद्दल योग्य माहिती व प्रबोधन करण्यात आले.सदर साप मिळाल्याची वर्दी वन विभागास दिली असता वन परीक्षेत्र अधिकारी रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शना खाली वनपाल पोवार व वन्यजीव पथक यांच्याकडे अजगर सुखरूप सुपूर्द करण्यात आला.“अजगर सहसा आपल्या परिसरात आढळत नाही,बऱ्याचदा माल वाहतूक होणाऱ्या वाहना मधून असे सर्प आपल्या भागात येतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.साप दिसताक्षणी वनविभाग अथवा जवळील सर्पमित्रास कळवावे.”
-सर्पमित्र प्रवीण खांडेकर,शिरोली (पुलाची) 8999583339/ 9028534370

error: Content is protected !!