शिरोळ / प्रतिनिधी
छावा स्पोर्ट्स शिरोळ आयोजित,शिरोळ प्रीमियर लीग 2024 या हाफ स्पीच क्रिकेट स्पर्धेत संघमालक निळकंठ उर्फ पिंटू फल्ले यांच्या पार्वतीज् फायटर्स या संघाने अजिंक्यपद पटकाविले. विजेत्या संघास रोख रक्कम कायम चषक माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले.
शिरोळ येथील आझाद मंडळाच्या क्रीडांगणावरील कै. शामराव पाटील यड्रावकर क्रीडानगरीत छावा स्पोर्ट्स आयोजित शिरोळ प्रीमियर लीग ही आयपीएल धर्तीवर हाफस्पीच क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली.या स्पर्धेत आठ संघानी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने झालेल्या या स्पर्धेत संघमालक निळकंठ उर्फ पिंटू फल्ले यांच्या पार्वतीज फायटर्स या संघाने विजेतेपद पटकाविले. उपविजेतेपद संघमालक शिवप्रताप मस्के व अमृत हेरवाडे यांच्या गोडी विहीर मंडळ एस. पी. बॉईज या संघास मिळाले. तृतीय क्रमांक संघमालक रणजीत माने यांच्या सात्विक सुपरकिंग या संघास, तर चतुर्थ क्रमांक संघमालक अस्लम गवंडी यांच्या हॉटेल नंदनवन व जयसिंगपूर उदगांव बँक स्पोर्ट्स या संघाने पटकावले.
स्पर्धेतील मालिकावीर खेळाडू- तेजस सुतार (पार्वतीज फायटर्स), उत्कृष्ट फलंदाज -शहानवाज मुल्ला (पार्वतीज फायटर्स), उत्कृष्ट गोलंदाज- दिगंबर इंगळे( एस. पी. बॉईज), उत्कृष्ट यष्टीरक्षक – आकाश माने (एस. पी. बॉईज), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – अनिकेत माने (हॉटेल नंदनवन स्पोर्ट्स), उदयोन्मुख खेळाडू- सुरज गुपचे ( एस. पी. बॉईज) या सर्व खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.माजी नगरसेवक एन वाय जाधव, रावसाहेब पाटील मलिकवाडे, निळकंठ उर्फ पिंटू फल्ले, सर्पमित्र अनिल माने, दिग्विजय माने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.छावा स्पोर्ट्सचे अध्यक्ष किरण माने गावडे यांनी स्वागत व प्रस्ताव केले. सेक्रेटरी रंजीत माने यांनी सूत्रसंचालन केले.छावा स्पोर्ट्सच्या सर्व पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांनी स्पर्धा यशस्वी करण्याकरिता विशेष परिश्रम घेतले.