इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर रुई गावातील एका प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्याने शाळेमध्ये मोबाईलवर विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढला होता याची माहिती शाळेच्या शिक्षकांना कळताच शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याला बोलावून मारहाण केली यामध्ये विद्यार्थी जखमी झाला होता.याची माहिती पालकांना मिळताच पालकांनी शाळेत येऊन शाळा संचालक यांना जाब विचारला यावेळी पालक शिक्षक व संचालक यांच्यात बैठक झाली हा सगळा प्रकार गैर समजातून झाल्या असल्याचे सांगितले याबाबत अधिक माहिती अशी की कबनूर गावातील दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने शाळेमध्ये मोबाईल आणून मित्र मैत्रिणीचा सेल्फी फोटो काढला होता व तो फोटो त्याच्या मित्राच्या मोबाईल मध्ये अपलोड केला होता याची माहिती काही विद्यार्थ्यांना मिळताच विद्यार्थ्यांनी याची माहिती शिक्षकांना दिली.शिक्षकांनी या विद्यार्थ्याला मोबाईल का? आणलास म्हणून शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याला मारहाण केली. यामध्ये विद्यार्थी जखमी झाला याची माहिती पालकांनी शाळेमध्ये येऊन शिक्षकांना जाब विचारले असता यावेळी शिक्षक व पालकांमध्ये काही काळ वादावादीचा प्रकार ही घडला. शिक्षक व संस्था चालक यांनी पालकांना विश्वासात घेऊन हा सगळा प्रकार गैरसमजातून झालेला असल्याचे सांगितल्याने या संपूर्ण प्रकारावर पडदा पडला असल्याची माहिती शाळेकडून देण्यात आली