पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
परभणी येथे घडलेल्या घटनेचा। व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यानी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काढलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ शिरोली पुलाची येथील बौद्ध समाजाच्या वतीने कडकडीत गाव बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला.परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिमेची एका माथेफिरूने विटंबना केल्याच्या व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यानी काढलेले अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची गावातील समस्त बौद्ध समाजाच्या वतीने गावातून संविधानाची प्रत व महापुरूषांची प्रतिमा हातात घेवून निषेधार्थ पदयात्रा व मोटरसायकल रॅली काढण्यात आली.रॅलीची सुरूवात समता परिसर समाज मंदिरातील महापुरुषांना अभिवादन करून ग्रामपंचायतीसमोर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास शिरोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून निषेधार्थ घोषणा देत शिरोली फाट्यावरील डाॅ बाबासाहेब आंबेडकर मार्गाच्या फलकास लोकनियुक्त माजी सरपंच शशिकांत खवरे यांनी पुष्पहार घालत घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला.यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य बाबासो कांबळे,शशिकांत खवरे, सुजित समुद्रे , रणजित केळुस्कर यानी आपले मनोगत व्यक्त केले.आज मंगळवार दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत रॅली काढत गाव बंदचे आव्हान करण्यात आले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत गावातील व्यापारी वर्ग,ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी पाठिंबा देत बंद शांततेत पाळण्यात आला.या बंदमुळे व्यापारी व व्यावसायिकांची कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली होती.यावेळी समस्त बौद्ध समाजातील कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते .