हेरले / प्रतिनिधी
हेरले येथील पवनराज पांडुरंग कोळेकर वय वर्ष 32 रा.आदिनाथ चर्चजवळ याला कौटुंबिक वादाचे कारणावरुन शिवीगाळ करत हातातील लोखंडी पान्याने डोकीत मारुन गंभीर जखमी केले.जखमींवर इचलकरंजी आयजीएम रुग्णालय त्यानंतर कोल्हापूर सीपीआर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारहाण केल्याप्रकणी हातकणंगले पोलीस ठाण्यात स्वप्निल बाळासो उर्फ कृष्णात कोळेकर वय वर्ष 37 रा.हेरले याच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की पवनराज पांडुरंग कोळेकर हे हेरले येथे राहण्यास आहेत.शेजारी भाऊबंद स्वप्निल बाळासो उर्फ कृष्णात कोळेकर वय वर्ष 37 हा आपले कुटुंबीयांसह राहणेस आहे.त्या दोघात 3 वर्षांपुर्वी कौटुंबीक कारणांवरुन वाद झाला होता.त्याचाच राग मनात धरून पवनराज कोळेकर हा त्याचा मित्र जुबेर शब्बीर मोगल लस्सी विक्री कामाकरीता जात असताना आदिनाथनगर येथे रस्त्यावर आले असता स्वप्निल कोळेकर हा गाडी थांबवुन पवनराज कोळेकरकडे बघुन शिवीगाळी करु लागला. काही वेळाने शिवीगाळी करत हातातील लोखंडी पान्याने पवनराज याच्या डोकीत मारल्याने पवनराज गंभीर जखमी झाला.जखमी पवनराज याला मित्र जुबेर मोगल याने पोलीस ठाणेस तक्रार देण्याकरीता आणले असता पोलीसांनी मला दवाखाना यादी देवुन उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय हातकणंगले येथे पाठवले.तेथे प्राथमिक उपचार करून मला पुढील उपचाराकरीता आयजीएम हॉस्पीटल इचलकरंजी येथे जाणेस सांगितलेने त्याप्रमाणे तेथे पुढील उपचार घेवुन पोलीस ठाणेस तक्रार दाखल केली आहे.