पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान व लोटस फाउंडेशन शिरोली पुलाची (ता.हातकणंगले) यांच्या संयुक्त विद्यमाने दीपावली निमित्त घेण्यात आलेल्या किल्ले स्पर्धा 2024 चे बक्षिस वितरण ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह पार पडला यामध्ये जय हनुमान घोडेगिरी तालीम मंडळाने प्रथम क्रमांक तर मावळ ग्रुप चव्हाण संकपाळ गल्लीने द्वितीय क्रमांक पटकावला तर सांघीक बक्षिसे ५ क्रमांक व वैयक्तिक ४ विजेत्या मंडळास श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई डॉक्टर अभिजीत अशोकराव माने यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली.महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड किल्ल्यांचा इतिहास आजच्या पिढीला समजायचा असेल तर त्यांना प्रत्यक्ष कार्यातून शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. त्यासाठी दगड – माती, चिखल, काळी तांबडी माती त्यांच्या हाताला लागली पाहिजे. जवळपासचे गड किल्ले यांना भेटी देवून त्यांची माहिती घेतली पाहिजे. त्यांना संरक्षित संवर्धित केले पाहिजे.तरच महाराष्ट्राचे हे वैभव टिकून राहील.हे सारे कृतीतूनच होईल. याच हेतू ने
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान व लोटस फाउंडेशन शिरोली पुलाची यांच्या संयुक्त विद्यमाने खास दीपावली निमित्त भव्य किल्ले स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत प्रथम क्रमांक जय हनुमान घोडेगिरी तालीम मंडळ द्वितीय क्रमांक,मावळ ग्रुप चव्हाण संकपाळ गल्ली तृतिय क्रमांक रणझुंजार तरुण मंडळ,चौथा क्रमांक श्री बिरोबा मंदिर , पाचवा क्रमांक शिवमुद्रा ग्रुप शिवनेरी यानी तर हिरकणी – ऐश्वर्या इंगवले हनुमान नगर , वैयक्तिक बक्षिसे १) पाटील बंधू रेणुका मंदिर माळवाडी २) श्रेयश पाटील ३) अभिमन्यू चव्हाण उत्तेजनार्थ श्रेयश तिरपने याना बक्षीस देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रेरणा मंत्र म्हणून छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करण्यात आला प्रस्तावना लोटस फाउंडेशनचे अध्यक्ष संभाजी भोसले तर बक्षीस वितरण माहिती अर्जुन चौगुले यांनी दिली.यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रवक्ते अभिनंदन सोळांकुरे,श्री शिवप्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव पाटील, जिल्हा कार्यवाहक सुरेश यादव,शिरोली तंटामुक्त समिती अध्यक्ष सतीश पाटील,नितीन चव्हाण,सचिन यादव,संदीप जाधव,राजू सावंत,गजानन कौंदाडे,संजय सावंत,शिवराज भोसले,शिवाजी कौंदाडे हे उपस्थित होते.