दत्तवाड / प्रतिनिधी
जिल्हा परिषद कोल्हापूर व पंचायत समिती शिरोळ आयोजित अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा दि.१ ते ३ जानेवारी २०२४ अखेर केंद्रीय कन्या शाळा दत्तवाड येथे तालुकास्तरीय स्पर्धा संपन्न होणार आहेत.त्यासाठी स्पर्धेसाठीचे नियोजन,मैदान व इतर आवश्यक सोईसुविधा बाबत चर्चा करण्यात आली.गट शिक्षण अधिकारी सौ.भारती कोळी,क्रीडा विभागप्रमुख एन.व्ही.पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी दिपक कामत व बीट विस्तार अधिकारी अनिल ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा तीन दिवसात संपन्न होणार आहेत.बुधवार दि.१ जानेवारी २०२५ रोजी लहान गट सांघिक (खो खो, कबड्डी)मोठा गट वैयक्तिक कुस्ती( ४०, ४५,५० किग्रॅ.) लांब उडी व उंच उडी.गुरुवार दि.२ जानेवारी २०२५ लहान गट वैयक्तिक -(५० व१०० मी.धावणे,लांब उडी व उंच उडी),मोठा गट रिले( ४x१००मी.),मोठा गट वैयक्तिक -(१००,२००,४००,६०० मी. धावणे),थाळीफेक व गोळाफेक.शुक्रवार दि.३ जानेवारी २०२५ रोजी मोठा गट सांघिक स्पर्धा (खोखो, कबड्डी)तर लहान गट कुस्ती (२५ .३०,३५ किग्रॅ.)संपन्न होणार आहे. स्पर्धेच्या तीनही दिवशी सर्व स्पर्धक व संघानी स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी ९वा. उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संयोजनासाठीच्या बैठकीसाठी शिक्षण विस्तार अधिकारी एन.व्ही.पाटील, केंद्र प्रमुख दत्तात्रय जाधवर,संजय निकम, यशवंत पेठे,क्रीडा समितीचे भालचंद्र खोत,दिपक पाटील,संतोष जुगळे, ₹फारुक फकीर,रघुनाथ देवमोरे,प्रितम गवंडी, तायाप्पा हाके,महंमदहनिफ मुल्ला,साताप्पा नेजे,नागनाथ आडसुळे, राजेंद्र कोरे,श्रीकांत बहीर,सुनिल शिरसाठ, चंद्रकांत कोरे यांचेसह केंद्र समन्वयक सुभाष कुरुंदवाडे, केंद्रशाळा मुख्याध्यापक कुमार सिदनाळे,सुभाष तराळ, दत्तात्रय कमते,रविंद्र सिदनाळे,शिवाजी ठोंबरे,अशोक कोळी,सहदेव माळी,सतिश यळगुडे,गुंडा परीट उपस्थित होते.स्वागत दिलीप शिरढोणे यांनी केले तर आभार केंद्रप्रमुख संजय निकम यांनी मानले.