कुमार आलास शाळेत पालक मेळाव्यात मार्गदर्शक शिक्षकांचा व देणगीदारांचा सत्कार

Spread the love

दत्तवाड / प्रतिनिधी

कुमार विद्या मंदिर आलास येथील शाळा व्यवस्थापन समिती,पालक मेळावा व सत्कार सभारंभ असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला.शाळेच्या केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक यशाबद्दल मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
मुख्याध्यापक तुकाराम भास्कर यांचा तसेच काडगोंडा पाटील यांचा शालेय विद्यार्थी खेळाडूना किट दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला व लक्ष्मण कबाडे यांचा खो -खो खेळाचा खास सराव घेतल्याबद्दल सत्कार करण्यात आला.वैयक्तिक क्रिडा प्रकारात राजू मुजावर व अजित कांबळे विजयकुमार चौगुले तसेच सांस्कृतिक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनिल कांबळे,माधुरी कोळी,दिपक विटेकरी व नानासो कागले यांनी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अध्यक्षा निलोफर बेग,उपाध्यक्ष मुस्ताक मुराशे,अमृता दानोळे,सुजाता कोळी,पल्लवी परीट,संगीता गावडे,कोमल गोट्या कोळी,शाळा व्यवस्थापन सदस्य व पालक राजअहमद सौंदलगे,शहेनशाह सौदलगे,मुस्ताक पटेल,तब्बसूम मोमीन,पूनम शेडबाळे,शुभांगी शेडबाळे, कविता कोळी,शबाना कलावंत,वर्षा परीट,पदमश्री हसुरे, कविता कोळी,संजय उपाध्ये पालक उपस्थित होते.

error: Content is protected !!