दत्तवाड / प्रतिनिधी
रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मेडिटेशन म्हणजेच ध्यान तुम्हाला आराम करण्यास मदत करते.जेव्हा आपली इंद्रिये सुस्त किंवा कंटाळवाणी होतात तेव्हा ध्यान आपल्याला आपली जागरूकता वाढवण्याची संधी देते. ध्यान केल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपातील तणाव दूर केला जाऊ शकतो.जे लोक नियमितपणे ध्यान करतात, त्यांना सरावाद्वारे त्यांचे शारीरिक आरोग्य तसेच भावनिक आरोग्य सुधारण्याची संधी मिळते.मेडिटेशन किंवा ध्यान हा एक मानसिक व्यायाम आहे.ज्यामध्ये विश्रांती, एकाग्रता आणि जागरुकता यांचा समावेश होतो. ज्याप्रमाणे शारीरिक व्यायाम हा आपल्या शरीराच्या हालचालींसाठी कार्य करते.अगदी, त्याचप्रमाणे ध्यान हा मनाचा आणि मेंदूचा व्यायाम आहे. हा व्यायाम सहसा वैयक्तिकरित्या शांत स्थितीत बसून आणि डोळे मिटून केला जातो.जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड कार्यक्रमांतर्गत शनिवार दि.२१ डिसेंबर २०२४ रोजी विद्या मंदिर बांबरवाडी,दत्तवाड ता.शिरोळ येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.अशोक रामचंद्र कोकणे यांनी मेडिटेशन चे प्रात्यक्षिक घेवून विद्यार्थ्यांना मेडीटेशनचे महत्व व फायदे यांविषयी माहिती दिली. मुख्याध्यापक श्री.दिलीप शिरढोणे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.