कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे
कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रकाश आबिटकर यांनी ज्येष्ठ नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांची राजाराम कारखाना कार्यस्थळावर भेट घेतली. यावेळी महाडिक साहेबांच्या हस्ते आबिटकर यांचा सत्कार करण्यात आला. राधानगरी तालुक्याला पहिल्यांदाच मिळालेल्या मंत्री पदाचा उपयोग शाश्वत विकासासाठी करावा अशा शुभेच्छा महादेवराव महाडिक यांनी दिल्या.