धरणाच्या गळतीमध्ये कापडी बोळे भरून शासनाच्या निषेधार्थ करणार – राजू शेट्टी

Spread the love
काळम्मावाडी / प्रतिनिधी
काळम्मावाडी धरणाच्या गळतीबाबत शासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची गरज असून दिवसेंदिवस दुधगंगा धरणाची गळती वाढू लागली असून प्रत्यक्षात सेकंदाला जवळपास ६५० ते ७०० लिटर पाणी या गळतीमधून वाया जावू लागले आहे.याबाबत शासनाने येत्या १५ दिवसात कार्यवाही न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने या गळतीमध्ये कापडी बोळे भरून शासनाच्या निषेधार्थ

राधानगरी तालुक्यातील जनतेला सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता दिला असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज शनिवार दिनांक 21 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता शिरोळ येथे दिली.काळम्मावाडी धरणाच्या गळतीबाबत स्वाभिमानीच्या पदाधिकारी यांचेसोबत राजू शेट्टी यांनी धरणाच्या गळतीच्या ठिकाणी प्रत्यक्षात भेट देऊन पाहणी केली.दुधगंगा धरणातून झालेल्या गळतीमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू असून २०२२ पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने याबाबत सातत्याने आवाज उठविण्यात येत आहे.मात्र शासनाकडून व पाटबंधारे विभागाकडून बेदखल करण्यात आहे.दिवसेंदिवस या गळतीचे प्रमाण वाढत असून संपुर्ण धरणाच्या भिंतीना पाझर दिसू लागला आहे.ठेकेदार व अधिका-यांच्या भ्रष्ट्र कारभारामुळेच गळतीचे प्रमाण वाढू लागले असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार,कागल तालुका अध्यक्ष डॉ.बाळासाहेब पाटील,तानाजी मगदूम , प्रा. जरग सर, इंद्रजित भारमल यांचेसह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!