दत्तवाड / प्रतिनिधी
प्रत्येकाच्या आयुष्यातील वर्षातील एक अनोखा दिवस म्हणजेच वाढदिवस होय. प्रत्येकजण आपापल्यापरीने वाढदिवस साजरा करीत असतात. पण काहीजण समाजासाठी काहीतरी योगदान देवून साजरा करतात. अशाच एक अनोखा वाढदिवस संपन्न झाला कुमार विद्या मंदिर कवठेगुलंद(गाव) या शाळेतील इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या कु.मधुरा अमोल हुलगबळी हिचा व इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या अबुबकर सूरज वाळवेकर याचा.
कु.मधुरा हिच्या वाढदिवसानिमित्त तिचे आजोबा श्री. हणमंत हुलगबळी यांनी शाळेस तिजोरी भेट दिली. यासाठी वर्गशिक्षिका सौ. शिलप्रभा माळी यांनी प्रेरित केले.शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभिष्टचिंतन करुन शुभेच्छा दिल्या.शाळेस तिजोरी भेट दिल्याबद्दल शाळेने कृतज्ञता व्यक्त केली.हुलगबळी परिवाराच्या या योगदानाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.याप्रसंगी अमोल हुलगबळी, सौ.सुवर्णा हणमंत हुलगबळी,सविता उपाध्ये,वैशाली आवटी,मुकुंद कुंभार, अरुण कांबळे, चंद्रकांत नवटे उपस्थित होते.प्रभारी मुख्याध्यापक दिपक कदम यांनी आभार मानले.त्याचप्रमाणे इयत्ता तिसरीतील विद्यार्थी अबुबकर सूरज वाळवेकर याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पालकांनी शाळेसाठी १००० रुपयांची देणगी दिली.अशा या अनोखा वाढदिवसाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.