इचलकरंजी शहरातील राज कॅसल हॉटेल समोर किशोर अकॅडमी ची स्कूल बसमध्ये बिघाड झाल्यामुळे बस सरळ रस्त्यावरील डिव्हायडर वर जाऊन आदळली यामध्ये कोणीही विद्यार्थी नव्हते हि स्कूल बस विद्यार्थ्यांना आणायला जात होती.हा अपघात दुपारी चार वाजता घडला आहे यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. इचलकरंजी शहरामध्ये अकॅडमी द्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते यासाठी विद्यार्थ्यांना अकॅडमी मध्ये येण्यासाठी व जाण्यासाठी स्कूल बस ची व्यवस्था करण्यात येत असते शहरातील किशोर अकॅडमी च्या वतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते आज संध्याकाळी चारच्या सुमारास शहरातील इचलकरंजी सांगली रोडवर असणाऱ्या राज कॅसल हॉटेल जवळ स्कूल बसचा बिघाड होऊन ई स्कूल बस सरळ डिव्हायडर वर जाऊन आदळली ही स्कूल बस यड्राव फाट्यावरून महासत्ता चौकाच्या दिशेने अकॅडमीकडे विद्यार्थ्यांना आणायला जात होती ही बस राज कॅसेल हॉटेल जवळ दुपारी चारच्या सुमारास आली असता बसचा स्टेरिंग रॉड तुटल्यामुळे ड्रायव्हरने प्रसंगावधान दाखवून ही स्कूल बस डिव्हाइड वर घातली व स्कूल बस त्याच ठिकाणी थांबवली यामध्ये कुणालाही दुखापत झाली नाही नशीब बलवत्तर होते म्हणून यामध्ये कोणीही विद्यार्थी नव्हते ही स्कूल बस विद्यार्थ्यांना आणायला जात होती दोनच दिवसापूर्वी शाहू पुतळा जवळ एका रिक्षाचा ब्रेक फेल होऊन रिक्षा सरळ जाऊन डंपरला धडकली होती यामध्ये काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले होते आज किशोर अकॅडमीची स्कूल बस डिव्हाइड वर गेल्यामुळे स्कूलबस चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याची माहिती पोलिसांनी मिळताच पोलिसांनी ही स्कूल बस रस्त्याच्या मधोमधून काही वेळातच बाजूला घेतली पण अपघात झाल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या व तसेच वाहतूक विस्कळीत झाली होती शाळा सुटण्याचा टाइमिंग मध्ये हा अपघात झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठे ताटकळत बसावे लागले होते किशोर अकॅडमीची बसचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत गावभाग पोलीस ठाण्यात सुरू होती.विनोद शिंगे कुंभोज