मोटरसायकलवरून जाताना अचानक चक्कर येऊन पडल्याने तरुणाचा मृत्यू

Spread the love

पुलाची शिरोली / कुबेर हंकारे

मोटरसायकलवरून जाणाऱ्या मनपाडळे ता.हातकणंगले येथील तरूणास अचानक चक्कर येऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाला.ही घटना शिये फाटा येथील ब्रीज खाली आज शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली.श्रीकांत विश्वास भोसले वय २६ असे मृत तरुणाचे नाव आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मनपाडळे येथील श्रीकांत भोसले हा कामानिमित्त जात असताना आज शिये फाटा येथील ब्रिज खालून जात असताना मोटरसायकलवरून पडला श्रीकांतच्या डोक्याला मार मागल्याने रक्तस्राव झाल्याने त्याच्या मृत्यू झाला. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत अपघाताची माहीती पुलाची शिरोली पोलिसांना दिली.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.या घटनेची नोंद शुक्रवार दिनांक श्रीकांत 13 डिसेंबर सायंकाळी 7 वाजता पुलाची शिरोली पोलिसात झाली आहे.श्रीकांत हा सेंट्रींग काम करत होता.आई-वडीलांना तो एकुलता एक मुलगा होता. त्याचा पश्चात पत्नी,एक मुलगा असा परिवार आहे.श्रीकांत याच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!