कार्यकर्त्यांनी पराभवाला खचून न जाता नव्या जोमाने कामाला लागा- मा.आ.आवळे

Spread the love

कुंभोज / प्रतिनिधी 

हातकणंगले मतदारसंघातील पराभव झटकून पुन्हा नव्या दमाने आपण सर्वांनी कामाला लागले पाहिजे. जिल्ह्यातील महायुतीचे प्रमुख नेते, लाडकी बहिण योजना आणि सत्ताधाऱ्यांचे आर्थिक पाठबळ यामुळे आपल्याला पराभव स्विकारावा लागला. मात्र सर्व नेते एका बाजूला असताना देखील महाविकास आघाडीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठबळावर मला जवळपास ८८ हजार मते मिळाली.गतवेळपेक्षा १५ हजारमते जास्त मिळाली आहेत त्यामुळे कौंग्रेस कार्यकर्त्यांनी पराभव झटकून कामाला लागावे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सर्व सामान्य कार्यकर्त्यांना संधी देत त्यांच्या विजयासाठी आपण सर्वांनी लढा देवूया.विधानसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच कौग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक हातकणंगले तालुका कौंग्रेस कमिटीत झाली. यावेळी प्रमुख कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी पराभवावर आपले म्हणणे मांडले. तसेच भविष्यात सर्वसामान्य नेते, कार्यकर्ते यांना ताकद देण्याची अपेक्षा व्यक्त केली.काँग्रेस तालुकाध्यक्ष भगवानराव जाधव, हातकणंगलेच्या नगराध्यक्ष अर्चना जानवेकर, महिला तालुकाध्यक्ष सविता पाटील, राजवर्धन पाटील , अण्णासो पाटील, डॉ. अभिजीत इंगोले, विश्वास कोळी, अनिल भातुकडे, एड. संदीप कदम, एम के चव्हाण, सुभाष माने , नंदकुमार कोठावळे , अमर पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले.बैठकीला इंदुमती गाढवे, तानाजी घोडेस्वार, विलास कांबळे , शकील अत्तार, प्रवीण जनगौंडा, उत्तम पाटील , विजय गोरड , शिवाजी पाटील , नूर मोहम्मद मुजावर, सुकुमार चव्हाण, भारत संजय चरणे, संपत रुपणे , सुरेश नाईक , अर्जुन पाटील, बादशाह देसाई , सुरेश पाटील, रणजीत पाटील आदी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

error: Content is protected !!