वयोवृद्ध कलाकारांना वेळेत मानधनसाठी प्रशासनाला हालगी वाजवून निवेदन देणार – डॉ दगडू माने

Spread the love

शिरोळ येथे लोककलाकारांच्या वतीने सोमवारी

हालगी वाजवून प्रशासनाला निवेदन  : डॉ दगडू माने
शिरोळ तालुक्यातील लोक कलाकारांकडून पंचायत समिती प्रशासनास साकडे
शिरोळ / प्रतिनिधी
शासनाच्या मानधन योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना प्रत्येक महिन्याला मानधन मिळावे.नव्याने मंजूर यादीनुसार मानधनाची सर्व रक्कम देण्यात यावी.मानधन वाटपातील तांत्रिक अडचणी तात्काळ दूर करून कलाकारांना तात्काळ लाभ द्यावा.मानधनाचे प्रलंबीत प्रस्ताव त्वरीत मंजुर करावेत या मागणीसाठी शिरोळ तालुका कलाकार संघटना व कलाकार महासंघ यांच्या वतीने सोमवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिरोळ पंचायत समिती कार्यालयासमोर हलगी वाजवून निवेदन देण्यात येणार आहे.अशी माहिती जेष्ठ कलाकार लखन कांबळे व डॉ दगडू माने यांनी शिरोळ येथे दिली.राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाने सर्वच कलाकारांच्यासाठी महिना ५ हजार रुपये मानधन देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.जेष्ठ कलाकार मानधन रकमेत वाढ झाल्याने कलाकारात समाधान आहे. मात्र या कलाकारांना वेळेत मानधन मिळत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.वृद्धापकाळ आणि आरोग्याच्या अडचणीमुळे वेळेत बँक खात्यावर मानधन जमा करावे अशी कलाकारांची अपेक्षा आहे.उतार वयात मानधन रक्कम हाच आधार असल्याने शासनाने कलाकारांना मानधन रक्कम तात्काळ दिली पाहिजे.काही कलाकारांना तांत्रिक अडचणींमुळे केवळ दोन – चार महिन्याचे मानधन देण्यात आले आहे. कोणत्या महिन्यातील किती मानधन मिळाले याविषयी तपशील मिळत नसल्यामुळे कलाकार संभ्रमात आहेत. कलाकार व त्यांच्या वारसांच्या मानधनकामी शासनाला जाग यावी याकरिता हलगी वादन व अन्य वाद्यवृंदाचा गडगडाट करीत पंचायत समितीच्या प्रशासनास लोककलाकार साकडे घालणार आहेत. तालुक्यातील कलाकारांनी सोमवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शिरोळ पंचायत समिती कार्यालयासमोर उपस्थित राहावे असे आवाहन माने यांनी केलं आहे.
error: Content is protected !!