सामाजिक कार्यकर्ते आदमभाई मुजावर यांना चारचाकी इनोव्हा गाडी भेट

Spread the love

सामाजिक कार्यकर्ते आदमभाई मुजावर यांना चारचाकी इनोव्हा गाडी भेट

महालक्ष्मी चौक व वेताळ ग्रुपच्या ककार्यकर्त्यांनी जपली सामाजिक बांधिलकी

जयसिंगपूर / प्रतिनिधी

जयसिंगपूर शाहूनगर येथील महालक्ष्मी चौक व वेताळ ग्रुप यांच्या वतीने दुर्गा महोत्सवाचे औचित्य साधून स्वराज्यक्रांती जन आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते आदमभाई मुजावर यांना चारचाकी इनोव्हा गाडी भेट देण्यात आली. महालक्ष्मी चौक व वेताळ ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यकर्त्याला उभारी देण्याच्या केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे.आदमभाई मुजावर यांनी शिरोळ तालुक्यातील जनतेच्या निगडित असणाऱ्या प्रश्नावर आतापर्यंत अनेक निषेध सभा,आंदोलने,मोर्चे, बेमुदत उपोषण लोकशाही मार्गातून केले आहेत. झोपडपट्टी धारक,कामगार,व्यावसायिक,विविध क्षेत्रातील नोकरदार याचबरोबर सामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जयसिंगपूर नगरपालिका,पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालय,प्रांत कार्यालय,जिल्हाधिकारी, संबंधित सरकारी अधिकारी यांच्यासह मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक निवेदने दिली आहेत.प्रसंगी बेमुदत उपोषणाचे शस्त्र हाती घेऊन लोकांना त्यांचे हक्क आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत.आम आदमी पार्टी,स्वराजक्रांती जन आंदोलन याचबरोबर विविध सामाजिक चळवळीशी बांधील राहत लोकशाही आणि संविधान वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. सर्वसामान्यांच्या अडीअडचणीत आणि त्यांच्या सुखदुःखात धावून जाणारा एक ‘हक्काचा माणूस’ अशी त्यांची प्रतिमा जन माणसात तयार झाली असल्यानेच महालक्ष्मी चौक व वेताळ ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी दुर्गा महोत्सवाच्या निमित्ताने त्यांना चार चाकी इनोव्हा गाडी भेट देऊन त्यांच्या कामाची दखल घेतली. आज मान्यवरांच्या उपस्थित त्यांना गाडी प्रदान करून यथोचित सत्कार केला.स्वराज्यक्रांती जन आंदोलन कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष कैलास काळे यांनी आपल्या प्रास्ताविकात आदमभाई मुजावर यांचा संघर्षमय इतिहास लोकांसमोर मांडला. तसेच गाडी भेट देण्यासाठी ज्या ज्या लोकांनी सामाजिक जबाबदारी म्हणून आर्थिक मदत केली, त्या सर्व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व हितचिंतक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आगामी काळातही असेच सहकार्य, मार्गदर्शन कायम राहावे, अशा भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमात वडार समाजाचे चेअरमन अमर पवार व व्हा. चेअरमन सतिश नलवडे व सामाजिक कार्यकर्ते महेश भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांनी आदम भाई मुजावर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
आदमभाई मुजावर यांचे स्वागत महालक्ष्मी चौक मंडळाचे अध्यक्ष बबलू नलवडे यांनी केले. गाडीचे पूजन संजय पवार यांनी केले.गाडीची चावी वेताळ ग्रुपचे अध्यक्ष राहुल नलवडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन महालक्ष्मी चौक व वेताळ ग्रुप यांच्या वतीने परसू शिंगाडे, उध्दव पवार, राम शिंगाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केले .श्री महालक्ष्मी चौक स्वराज्यक्रांती जनआंदोलन व वेताळ ग्रुप तर्फे …
अध्यक्ष बबलू नलवडे व वेताळ ग्रुपचे अध्यक्ष राहुल नलवडे व इतर सदस्य संजय पवार ,बबलू शिंदे, विनायक नलवडे गजानन पवार, सतीश नलवडे, अमर पवार, महेश भोसले,राज पवार, राम शिंगाडे, कैलास काळे,उध्दव पवार, अमोल नलवडे, सचिन मिसाळ, किरण पवार, अविनाश नलवडे, परसु नलवडे,रोहीत पवार, सागर पवार,अमोल नलवडे, परसू शिंगाडे अक्षय सोनवणे, जीवन मुदगल, रवि पवार, अनिकेत नलवडे, परशराम पवार, छोटू गाडीवडार, यांच्यासह पदाधिकारी , कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.

error: Content is protected !!