शिरोली येथे क्रॉकटीरीकरण कामाचा शुभारंभ – सरपंच सौ पद्मजा करपे
कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे
शिरोली पुलाची ग्रामपंचायत यांच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या वस्तीचा विकास करणे सन 2023/2024 वार्ड क्र. 6 मधील भाऊसो चव्हाण घर ते खांडेकर घरापर्यंत क्रॉकटीरीकरण कामाचा शुभारंभ लोकनियुक्त सरपंच सौ पद्मजा कृष्णात करपे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच कृष्णात करपे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले शिरोली गावाचा सर्वागीन विकासासाठी आमचे नेते राजाराम साखर कारखाना चेअरमन व माजी आमदार श्री अमल महाडिक साहेब कटीबद्ध आहेत तसेच येत्या काळात प्रसाद हॉटेल ते पांडुरंग चौगुले (महाराज) यांच्या घरापर्यन्त डाबरिकरण करण्यात येणार आहे.हनुमान हॉटेल येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजप्रवेशद्वार व जयभवानी मार्ग असा बांधण्याचा मानस आहे यावेळी उपसरपंच बाजीराव पाटील मा.उपसरपंच अविनाश कोळी मा.उपसरपंच कृष्णात करपे सर्व ग्रामपंचायत सदस्य, सदस्या जेष्ठ नेते श्री.प्रकाश कौदाडे, शिवाजी समुद्रे, सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी, भाऊसो चव्हाण, बबन संकपाळ, संजय पाटील तसेच या भागातील नागरिक मोठ्या सख्येने उपस्थित होते.