पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकार
पुलाची शिरोली येथील कार्यतत्पर कोतवाल संदीप धोंडीराम पुजारी यांचा शिरोली विकास सेवा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.संदीप पुजारी हे २०१४ पासून पुलाची शिरोली येथे गावकामगार तलाठी कार्यालयात कोतवालपदी काम करीत आहेत.दैनंदिन काम असो, महापुराच्या वेळी काम असो, महामार्गावरील आंदोलन असो, अचानक वोढावलेली कोणतीही आपत्ती असो यासह कोणत्याही कामात अत्यंत जबाबदारीने सेवेत तत्पर असतात याची दखल घेवून कोतवाल संदीप पुजारी, नितीन चव्हाण, नूतन उपसरपंच बाजीराव पाटील, पंचगंगा पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन राजेश पाटील, महावितरण चे प्रधान तंत्रज्ञ अशोक कोळी तसेच पी एस आय किसन पुजारी,पी एस आय सागर मोरे , ऋषिकेश माजगावकर आर्मी मध्ये भरती झाल्याबद्दल त्यांचाही शिरोली विकास सेवा संस्थेच्या वतीने हा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चेअरमन धनाजी पाटील, व्हा. चेअरमन मदन संकपाळ, पेठवडगाव बाजार समितीचे चेअरमन सुरेशराव पाटील, राजाराम साखर संचालक दिलीपराव पाटील, अमित मुखरे, संजय पाटील, बाबासाहेब कांबळे, जगन्नाथ पाटील, विश्वास गावडे, शब्बीर देसाई, अनुसया करपे, कमल सोडगे , संस्थेचे सर्व पदाधिकारी सभासद आदी उपस्थित होते.