युवकाचा निर्घृण खून प्रकरणी तीन संशयितावर गुन्हा दाखल

Spread the love

खोतवाडीत युवकाचा निर्घृण खून

इचलकरंजी / प्रतिनिधी

खोतवाडी येथे आरोही बारजवळ तारदाळ येथील जावईवाडी परिसरातील मयुर दिपक कांबळे ( वय 25 ) या युवकाचा तिघा युवकांनी धारधार शस्त्रांनी वार करून निर्घृण खून केला.ही घटना शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.या प्रकरणी रात्री उशिरा शहापूर पोलिसांनी तिघा संशयितावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मृत मयूर कांबळे युवक तारदाळ येथील जावईवाडी मध्ये राहण्यास आहे.तो हमालीचे काम करत होता.मयूर व त्याचा मित्र चव्हाण या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी मोठा वादही झाला होता.त्यावेळी शेजारी व त्याच्या मित्रांनी हा वाद मिटवला होता. पण पुन्हा काल शनिवारी सकाळी वाद झाला.दरम्यान रात्री तारदाळ येथीलच चार युवक एका बारमध्ये दारू पिण्यासाठी बसले होते.यावेळी पूर्वीच्या अनैतिक संबंधातून झालेल्या वादाचा राग उफाळून आल्याने जोरदार वादावादी झाली.यावेळी मारेकऱ्यांनी तलवारीसारख्या धारदार शस्त्रांनी मयुरला गाठून हल्ला चढवला.तसेच मयुर खाली कोसळल्याने मारेकऱ्यांनी दगड घेवून डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा केला.

error: Content is protected !!