कुरुंदवाड शहरात गुलाल उधळण,फटाकेबाजी,साखर पेढे वाटून जल्लोष

Spread the love

मनोज जरांगे – पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर यश आले.मराठा  आरक्षणाच्या संदर्भात शिंदे सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत,त्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा अध्यादेश राज्य सरकारने  काढल्याने कुरुंदवाड शहरात गुलाल उधळन,फटाकेबाजी, साखर पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.यावेळी मराठा आरक्षणाचा हा ऐतिसाहसिक विजय असल्याच्या भावना मराठा बांधवांनी व्यक्त केल्या. यावेळी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!