सदलगा येथील प्रत्येक मंदिरात व घरोघरी २२ जानेवारी रोजी दीपोत्सवाचे आवाहन

Spread the love

सदलगा शहरातील प्रत्येक मंदिरात व घरोघरी २२ जानेवारी रोजी प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त दीपोत्सवाचे आवाहन.
अयोध्येमध्ये होणाऱ्या श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा समस्त हिंदू धर्मियांच्या श्रध्देचा विषय असून या दिवशी शहरातील प्रमुख मंदिरामध्ये दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील प्रमुख मार्गावर ध्वज ,पताका लावण्यात येणार असून २२ जानेवारी रोजी सकाळी सर्व मंदिरामध्ये अभिषेक तर हनुमान मंदिरामध्ये मोठ्या पडद्यावर अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सादर करण्यात येणार आहे. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी प्रत्येकांनी आपले घर व परिसर स्वच्छ करून रांगोळी घालून , घरावर ध्वज-पताका लावून विद्युत रोषणाई करून , दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन रा.स्व.संघाच्या सद्लगा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी रा.स.संघाचे शांतिनाथ उगारे, अक्षय पाटील , अमित हणबर, पवन सबकाळे, पुनित सुनगार , रोहन हणबर, वैभव हणबर, शुभम हणबर उपस्थित होते.

error: Content is protected !!