नृसिंहवाडी / प्रतिनिधी
दत्तजयंती निमित्त श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात आजपासुन अखंड नाम,जप,यज्ञ व सामुहिक श्री गुरुचरित्र पारायण वाचन सप्ताहास सुरुवात झाली.सकाळी वीणा,टाळ,माळ,सर्व ग्रंथ,आयुधांची विधीवत पुजन करुन सप्ताहाकाळातील अकरा विभागाच्या सेवा सुरु करण्यात आल्या.यामुळे पुर्ण सप्ताहात २४ तास अखंडीतपणे श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन,नामस्मरण करीत अखंड वीणा वादन,नामजप सेवा श्री स्वामी चरणी रुजु करण्यात येणार आहेत.सेवा मार्गाच्या याज्ञिकी विभागाकडुन विधीवत मंत्रोपचार करीत यजमानांच्या हस्ते दहा मडंलाची स्थापना करण्यात आली.यामधील श्री गणेश,मातृका, योगिनी,वास्तु,सर्वतोभद्र,ब्रम् हमडंल,क्षेत्रपाल,नवग्रह,रुद्र, चंडीपीठ आदी स्थापित देवतांचे हवन, अग्निस्थापना करण्यात आली.सकाळी आठ वाजता भुपाळी आरतीनतंर विश्व कल्याणाचा संकल्प करुन सामुहिक श्री गुरुचरित्र वाचनास सुरुवात झाली,साडेदहा वा.मान्यवच्या हस्ते नैवेध आरती करण्यात आली.दुपारच्या सत्रात श्री दुर्गासप्तशती,श्री स्वामी चरित्र सारामृताचे वाचन झाले.सांयकाळी सहा वाजता औंदुबर प्रदक्षिणा करुन साडेसहा वा.नैवेध आरती झाली.सांयकाळच्या सत्रात सप्ताहाकाळीतील नित्यसेवा,नित्यधान, श्री विष्णुसहस्त्रनाम पठण,गीतेचा पंधरावा अध्याय आदी सेवा श्री स्वामी चरणी रुजु करण्यात आल्या.सप्ताह पारायणासाठी कोल्हापुर,सांगली, सातारा,पुणे,नाशिक आदी जिल्ह्यातुन श्री स्वामी समर्थ सेवेकरी सेवा करण्यासाठी आले आहेत. यामुळे श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाममध्ये भक्तीमय वातावरणात श्री स्वामी समर्थ नामाचा गजर सुरु आहे.सप्ताहामुळे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले आहे. दर्शनासाठी स्वामी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.