अलमट्टी धरण उंचीवाढीच्या विरोधात कर्नाटक सरकारचा पुतळा जाळला

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा निषेधार्थ कुर्डूवाडी पालिका चौकात शेतकरी नागरिक आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन कर्नाटक सरकारचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला.आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारला अलमट्टी धरण उंची वाढीला त्वरित स्थगिती देण्याची मागणी केली, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा दिला आहे.कुरुंदवाड पालिका चौकात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता एकत्रित येऊन कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. कर्नाटक सरकारचा पुतळा धरण करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी पुतळा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. आंदोलन आणि पोलिसांच्या यावरून झटापट झाली.यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील म्हणाले अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास सांगली, कोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्रातील अनेक भागात आणि शेतीत महापुराचे पाणी तुंबून राहणार आहे. या पाण्याचा विसर्ग व्हायला दीड ते दोन महिने लागणार आहेत यामुळे कृषी बरोबरच आर्थिक हानी मोठी होणार आहे.यामुळे शिरोळ तालुक्याचे मोठे नुकसान होणार आहे.कर्नाटक सरकारने हा निर्णय रद्द करावा केंद्र सरकारने या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी केली.यावेळी बोलताना माजी नगरसेवक उदय डांगे म्हणाले मे महिन्यात कर्नाटकात पाणी नसल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडे कर्नाटक सरकारने पाण्याची मागणी केली होती.कर्नाटक सरकारला पाणी देऊन महाराष्ट्र सरकारने पुण्य कमावले होते.याची उतराई उंची वाढवून कर्नाटक सरकार करत आहे का असा रोखठोक सवाल केला.यावेळी सिताराम भोसले,शरद आलासे,रघु नाईक,चंद्रकांत मोरे,सुनील कुरुंदवाडे, महिपती बाबर, दिलीप बंडगर,रामचंद्र मोहिते, दीपक गायकवाड, सुरेश बिंदगे,रमेश भुजुगडे,चंद्रकांत जोग, आदींनी भाषणे केली.यावेळी आंदोलनात विश्वास बालीघाटे, बंडू खराडे,फारूक जमादार,बाळासाहेब देसाई राजेसाहेब झाडवाले,महावीर पाटील गोपाळ चव्हाण, रामचंद्र मोहिते आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!