उत्सवाच्या मुख्य दिवशी धार्मिक सोहळा उत्साहात दर्शनासाठी भाविकांची रीघ
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळचे ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसानिमित्त धार्मिक सोहळा अमाप उत्साहात संपन्न झाला.हजरत नूरखान बादशाह उरुसाचा आज मुख्य
दिवस हजरत नूरखान बादशाह की दोस्तारो धिनच्या गजरात शिरोळ नगरपरिषद आणि उत्सव व उरुस संयोजन समितीच्यावतीने मान्यवरांच्या आणि भाविकांच्या उपस्थितीत
भक्तिमय वातावरणात हजरत नूरखान बादशाह यांच्या समाधी स्थळास मानाचा गलिफ अर्पण करण्यात आला दर्गाह येथे दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची रीघ लागली होती.
सोमवारपासून श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरसाची सुरुवात झाली गुरुवार हजरत नूरखान बादशाह उरुसाचा आज मुख्य दिवस यामुळे दर्ग्यात पहाटेपासूनच दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली होती.
हजरत नूरखान बादशाह की दोस्तारो धिनच्या गजरात गलिफ नारळाचे तोरण नैवेद्य धूप अगरबत्ती कापूर अर्पण करून भाविकांनी हजरत नूरखान बादशाह यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले
शिरोळ नगरपरिषद व श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस संयोजन समितीच्यावतीने मानाच्या गलेफाची बँड पारंपारिक वाद्याच्या गजरात आणि शोभेच्या
दारूची आतिषबाजी करत नगरपरिषदेपासून हजरत नूरखान बादशाह दर्गापर्यंत शाही मिरवणूक काढण्यात आली हजरत नूरखान बादशाह यांच्या समाधी स्थळास मानाचा गलिफ अर्पण करण्यात आला मिरवणुकीच्या दरम्यान मार्गावर आकर्षक
शोभेच्या दारूची आतिषबाजी करण्यात आली हजरत नूरखान बादशाह की दोस्तारो धिनचा जयघोष भाविकांनी केला.
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील,जे जे मगदूम शिक्षण समूहाचे
चेअरमन विजयराव मगदूम,अँड.सौ.सोनाली मगदूम,उद्योगपती राजेश पाटील,गजानन देसाई,शरद उर्फ बापू मोरे,रावसाहेब देसाई यांच्या हस्ते पालिकेचे प्रशासक
निशिकांत प्रचंडराव,माजी आमदार उल्हास पाटील,माजी युवानेते पृथ्वीराज यादव,माजी सरपंच गजानन संकपाळ,माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील,माजी नगरसेवक पंडित काळे,
इम्रान अत्तार,विठ्ठल पाटील,राजाराम कोळी,विराजसिंह यादव,विजय आरगे,आप्पालाल चिकोडे,फत्तेलाल मेस्त्री,संजय शिंदे,जनार्दन कांबळे,निळकंठ उर्फ पिंटू फल्ले,सुरज कांबळे,
विजय माने-देशमुख,संजय चव्हाण,धनाजी पाटील-नरदेकर,अविनाश उर्फ पांडुरंग माने,ओंकार माने-गावडे, बाबासाहेब आरगे,आयुब मेस्त्री,उदय संकपाळ,संभाजी हेरवाडे, हैदर मेस्त्री,
जब्बार मेस्त्री,बाळासाहेब कांबळे,शक्तीजीत गुरव, परवेज मेस्त्री,इस्माईल मत्ते,रशीद मत्ते,हसन मुजावर,अजित चिकोडे,आयुब तहसीलदार,मारुती पुजारी,वैभव काळे,अमित उर्फ बंटी संकपाळ,
नासरभाई पठाण,अनिरुद्ध कोळी,हसन मुजावर,सागर भाट,काकासो कोळी,संभाजी जाधव,सुभाष भंडारे,सुनील संकपाळ,संजयसिंह यादव,सुवर्णा कोळी,शिवाजी कोळी,बापूसाहेब गंगधर,प्रकाश माळी,बाळासाहेब कोळी, नेताजी जाधव,
कृष्णा भाट,बबन पुजारी,बजरंग वंटे(महाराज), वासिम मुल्लानी,श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस संयोजन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जगदाळे,उपाध्यक्ष संतोष विटेकरी,खजिनदार राहुल कोळी, सचिव किरण जगताप,
ऑडिटर पिराजी जयान्नावर,स्वागताध्यक्ष पिराजी हेरवाडे,कार्याध्यक्ष संतोष घाडगे,संयोजक लखन कुंभार,सहसंयोजक सागर कांबळे,सहस्वागताध्यक्ष संजय जगदाळे,सहकार्याध्यक्ष संदीप कोळी,सहखजिनदार कुमार जयान्नावर,
नितीन कोळी,सहऑडिटर प्रताप जगदाळे,सहसचिव गणेश मोरे यांच्यासह पवनपुत्र तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य मार्गदर्शक कार्यकर्ते यांच्यासह हजारो भक्तांच्या उपस्थितीत
हजरत नूरखान बादशाह की दोस्तारो धिनच्या जयघोषात हजरत नूरखान बादशाह यांच्या समाधी मानाचा गलिफ अर्पण करण्यात आला.दर्ग्याचे पुजारी सुलतान देवर्षी यांनी दुवा केली.