शिरोळ-अर्जुनवाड मार्गावर जेसीबी व मोटरसायकल अपघातात तरुण ठार

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ अर्जुनवाड मार्गवार जेसीबी व मोटरसायकल यांच्या झालेल्या अपघातात मोहीब महंमदशफी अथणीकर वय वर्ष 20 राहणार कुरुंदवाड हा मोटरसायकल स्वार हा गंभीर जखमी झाला त्याला मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मोहिबचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अपघाताची शिरोळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.याबाबत घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली माहिती अशी की कुरुंदवाड येथील मोहीब महंमदशफी अथणीकर हा तरुण कुरुंदवाडहुन मिरज येथे कॉलेजला MH 09 CZ 8785 ही सुझुकी एक्सेस मोटरसायकलवरून जात असताना शिरोळ अर्जुनवाड मार्गावर असणाऱ्या स्वागत कमानी जवळ अर्जुनवाड येथील जेसीबी वीटभट्टीकडे जाणाऱ्या जेसीबीला समोरून जोराची धडक झाली.अपघातात मोहिब हा गंभीर जखमी झाला होता त्याला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मात्र त्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी जेसीबी चालक याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.मोहिबच्या पश्वात आई-वडील बहीण असा परिवार आहे.मोहीब याचा अपघाती निधन झाल्याने कुरुंदवाड शहरात हळहळ व्यक्त होत आहे.सदर अपघाताची नोंद शिरोळ पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!