इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथील व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष,खजिनदार व सचिवपदांसाठी नुकत्याच निवड प्रक्रिया पार पडल्या.या निवडीत साईनाथ जाधव यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.संघटनेच्या उपाध्यक्ष पदासाठी रविकिरण चौगुले यांची नियुक्ती झाली आहे.तर खजिनदार म्हणून शैलेंद्र चव्हाण यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.सेक्रेटरी पदाची धुरा संतोष काटकर सांभाळणार आहेत. व्हाईस ऑफ मीडिया ही संघटना पत्रकार व माध्यम कर्मचाऱ्यांच्या हितांसाठी कार्यरत असून, त्यांच्या समस्या, अधिकार व विकासासाठी प्रयत्नशील राहते. नव्या कार्यकारिणीने संघटनेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.या निवडीदरम्यान संघटनेच्या सर्व सदस्यांनी एकत्र येत आपली एकजूट दाखवून दिली.साईनाथ जाधव यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर संघटनेच्या सदस्यांचे आभार मानले आणि माध्यम क्षेत्रातील आव्हाने पेलण्यासाठी संघटनेला अधिक बळकट करण्याचा संकल्प केला.उपाध्यक्षपदी निवड झालेल्या रविकिरण चौगुले यांनी संघटनेच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये सक्रिय सहभाग घेतला जाईल,असे आश्वासन दिले.
खजिनदारपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या शैलेंद्र चव्हाण यांनी संघटनेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता ठेवण्याचे उद्दिष्ट मांडले. सेक्रेटरी संतोष काटकर यांनी संघटनेच्या कार्याची गती वाढवण्यासाठी संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर दिला.या निवडीवेळी साईनाथ जाधव,रविकिरण चौगुले,संतोष काटकर, शैलेंद्र चव्हाण,निखील भिसे,रोहन हेरलगे,टिपू सनदी,अजित लटके,संतोष मोकाशी, कमलाकर जाधव,शहाहुसेन मुल्ला, बाळासाहेब पाटील, महेश आंबेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.