पंचगंगा शुगर्सची घोषणा देणार विनाकपात ३,३०० रू.दर – पी.एम.पाटील

Spread the love
इचलकरंजी : प्रतिनिधी
देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर  कारखाना लिज युनिट श्री रेणुका शुगर्स लि.या  कारखान्याने २०२४-२०२५ च्या हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३३०० रुपये एकरकमी, विना कपात दर देण्याचा निर्णय कारखान्याचे चेअरमनी पी.एम.पाटील यांनी जाहीर केला.कारखान्याने मागील गाळप हंगामात ऊसाला उच्चांकी दर देऊन संपूर्ण रक्कम वेळेत आदा केली आहे.सद्या कारखाना पुर्ण क्षमतेने सुरु आहे.चालू गाळप हंगामासाठी कारखान्याकडे ११ हजार हेक्टर ऊसाची नोंद झाली असून कारखान्याने यावर्षी १० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.तरी सर्व ऊस उत्पादक,सभासद,शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस पंचगंगा कारखान्याकडे गाळपास पाठवून सर्वाधिक दराचा लाभ घेण्याचे आवाहनही कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील यांनी केले आहे.यावेळी रेणुका शुगर्सचे आसोसिएटस् व्हा.प्रेसिडेंट प्रकाश सावंत,असि.डे.जनरल मॅनेंजर केन सी.एस.पाटील,मॅनेंजर एच आर् शिरीष रासनकर,केन मॅनेंजर प्रशांत चांदोबा, प्र.का.संचालक नंदकुमार भोरे उपस्थित होते.
error: Content is protected !!