कुरुंदवाड येथील आभार सभेच्या निमित्ताने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह कुरुंदवाड शहरातील वयोवृद्ध झालेल्या दोन माजी नगराध्यक्षांनी माझी धास्ती बरीच घेतलेली दिसत आहे.या दोन ज्येष्ठ नेत्यांना हाताशी धरून माझ्यावर निशाणा ठेवण्यापेक्षा या दोन माजी नगराध्यक्षांना घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कुरुंदवाड नगरपालिकेत स्वतंत्र पॅनेल उभा करावे मी आता राजकीय सामाजिक जीवनामध्ये खूप समाधानी आहे.कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीत युवकांना संधी देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असून त्यानुसार माझी मोर्चे बांधणी सुरू आहे.तथापि माझा शेतकरी चळवळीला कोणताच विरोध नाही कारण मी एक जातीवंत शेतकरी आहे.चळवळीतील प्रवृत्तीला विरोध आहे कारण शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांच्या नुकसानीस कारणीभूत ठरणाऱ्या नेत्याला नेता कसे म्हणायचे असा सवाल ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला.साखर कारखानदारांना चोर आहेत हे छाती बडवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे सांगत फिरत आहेत.मात्र हेच शेट्टी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील यांचे मतदानादिवशी पुलिंग एजंट म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांना कारखानदार चोर वाटले नाहीत का? असा सवाल उपस्थित करून ते पुढे म्हणाले खासदार शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक व नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सेवा संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानीने काँग्रेस राष्ट्रवादी भाजपा शिवसेना यांच्याबरोबर त्या वेळी युती केली आहे.कारखानदारांना लाखोली वाहणाऱे शेट्टी हे आता नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि जिल्हा बँकेत गोमूत्र शिंपडून पवित्र होणार आहेत का असा उलट्या सवाल डांगे यांनी उपस्थित केला.