कुरुंदवाड / प्रतिनिधी
कुरुंदवाड येथे शिरोळ निवडणुकीसाठी येथील 21 मतदान केंद्रावरील 22 हजार 22 मतदारांपैकी 16 हजार 826 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला 76.40 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.तर खिद्रापूर,राजापूर, राजापूरवाडी, अकीवाट,मजरेवाडी, बस्तवाड या ग्रामीण भागामध्ये अत्यंत चुरशीने मतदान झाले.86 टक्केच्या पुढे मतदानाची नोंद झाली.कुरुंदवाड पालिका प्रशासनाने लेख वाचवा अभियान अंतर्गत मतदान केंद्रात येताना स्वागत आला मंडप उभारणी करून ब्रीद वाक्याचे लावून मतदारांचे लक्ष वेधले होते.दरम्यान लोकसभा निवडणुकी दरम्यान प्रभाग क्र 8 मध्ये मतदान संख्या जास्त असल्याने रात्री उशिरा 8 वाजेपर्यंत मतदान सुरू होते. त्यामुळे निवडणूक विभागाने 3 मतदान केंद्राची वाढ करत मतदारांची सोय केली होती.कुरुंदवाड शहरातील 21 मतदान केंद्रातून झालेले अनुक्रमे मतदान केंद्र क्रमांक व मतदान पुढील प्रमाणे
केंद्र क्रमांक 210वर झालेले मतदान 921,
केंद्र क्रमांक 211 वर झालेले मतदान 911,
केंद्र क्रमांक 212 वर झालेले मतदान 527,
केंद्र क्रमांक 213 वर झालेले मतदान 1109,
केंद्र क्रमांक 214 वर झालेले मतदान 912,
केंद्र क्रमांक 215 वर झालेले मतदान 746,
केंद्र क्रमांक 216 वर झालेले मतदान 900,
केंद्र क्रमांक 217 वर झालेले मतदान 647
केंद्र क्रमांक 218 वर झालेले मतदान 537,
केंद्र क्रमांक 219 वर झालेले मतदान 517,
केंद्र क्रमांक 220 वर झालेले मतदान620,
केंद्र क्रमांक 221 वर झालेले मतदान 1020,
केंद्र क्रमांक 222वर झालेले मतदान 1056,
केंद्र क्रमांक 223 वर झालेले मतदान 920,
केंद्र क्रमांक 224 वर झालेले मतदान 923,
केंद्र क्रमांक 225वर झालेले मतदान 781,
केंद्र क्रमांक 226 वर झालेले मतदान 567,
केंद्र क्रमांक 227 वर झालेले मतदान 573,
केंद्र क्रमांक 228वर झालेले मतदान 938,
केंद्र क्रमांक 229 वर झालेले मतदान 852,
केंद्र क्रमांक 230 वर झालेले मतदान 849,
अशा 21 केंद्रावर 15 हजार,914 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.तर बस्तवाड येथे 1557 मतदारांनी मतदान केले 85 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.मजरेवाडी येथे 1892 मतदारांनी मतदान केले 84 टक्के मतदानाची नोंद झाली, अकिवाट येथे 5459 मतदारांनी मतदान केले 83 टक्के मतदानाची नोंद झाली,राजापूरवाडी येथे 941 मतदारांनी मतदान केले 86 टक्के मतदानाची नोंद झाली,राजापूर येथे 2623 मतदारांनी मतदान केले 85 टक्के नोंद झाली खिद्रापूर येथे 2024 मतदारांनी मतदान केले 88 टक्के नोंद झाली.सकाळपासूनच कोठेही वादविवाद न होता शांततेने मतदान झाले.मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना ने-आण करण्यासाठी वाहनांची सोय केली होती तर शासनाच्यावतीने अपंग मतदारांना करण्यासाठी शासकीय वाहनांची सोय केली होती.दरम्यान सकाळपासूनच मतदानाला जोर होता.मतदान करण्यासाठी शांततेत मतदान सुरू होते दुपारी साडेतीन नंतर मतदारांनी जोर धरला होता.