मतदान केंद्रांवरती दिव्यांग मतदारांचे गुलाब पुष्प, सन्मानपत्र देऊन स्वागत
शिरोळ / प्रतिनिधी
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने २८० शिरोळ विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या विविध मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच दिव्यांग मतदारांचे मतदान झाल्यानंतर सदरच्या मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजाविल्याबद्दल कोल्हापूर जिल्हाधिकारी महोदय यांचेमार्फत देण्यात येणाऱ्या सन्मानपत्रांचे वाटप करण्यात आले आले.
दिव्यांगांना सुलभतेने आपले मतदान करता यावे या करिता प्रत्येक मतदान केंद्रावरती व्हील चेअर, रॅम्प, पिण्याचे पाणी इत्यादीची सोय करण्यात आली होती. तसेच दिव्यांग मतदानाचा टक्का वाढवा या करिता मतदानाबद्दल विविध प्रचार,प्रसिद्धी व जनजागृती करण्यात आली होती.या सर्वाचे नियोजन जिल्हा स्तरावर जिल्हा समन्वय अधिकारी तथा कोल्हापूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी पाहिले.तसेच शिरोळ तालुका स्तरावरील कामकाज अमोल घुगे,सौ. कल्पना पाटील, सौ.साधना कांबळे , योगेश घोरपडे व अभिनंदन देशमुख तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळांचे कर्मचारी यांनी पार पाडले.