२ कोटी रुपयांच्या निकृष्ट दर्ज्याच्या कामाची केली पोलखोल

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी शहरामध्ये बांधकाम खात्यामार्फत अटल बिहारी वाजपेयी चौक ते डेक्कन चौकापर्यंत दोन कोटी वीस लाख रुपयाच्या

रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.हे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे.याची पोलखोल सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी केले आहे व काम थांबवण्यात आले आहे.चांगल्या कामाच्या  दर्जाची मागणी केली आहे.याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी बांधकाम विभागाकडे केली आहे.इचलकरंजी शहरामध्ये राज्य शासनामार्फत अटल बिहारी वाजपेयी चौक ते डेक्कन चौकापर्यंत दोन कोटी वीस लाख रुपयाच्या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.त्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. मक्तेदार कडून या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम सध्या सुरू आहे.रस्त्यावर खडीकरण केले असताना यामध्ये यामध्ये डांबर कमी व पिट्टी पावडर जास्त मिक्स करण्यात आली आहे.रस्त्यावरची साफसफाई न करता या ठिकाणी मातीवरच रस्ता करण्यात येत आहे.त्यामुळे आत्ताच टाकलेली खडी उकरून बाहेर येत आहे.राज्य सरकारकडून चांगल्या पद्धतीचे रस्ते व्हावे अशी सूचना असताना सुद्धा मक्तेदार कडून निकृष्ट दर्जाचा रस्ता करण्यात येत आहे.या निकृष्ट रस्ता करण्यामध्ये कोणाची टक्केवारी आहे.की काय असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी आज या निकृष्ट दर्ज्याच्या कामाची पोलखोल केली आहे व हे काम थांबवण्यात आले आहे.याची तक्रार बांधकाम विभाग हातकणंगले यांच्याकडे करण्यात आले आहे.निकृष्ट दर्जाचे काम मक्तेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी हत्तीकर यांनी केली आहे.

Spread the love
error: Content is protected !!