शिरोली पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार रोहित सातपुते एक वर्षासाठी हद्दपार

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिरोली MIDC पोलीस ठाणे हददीतील गुन्हेगार रोहित शहाजी सातपुते वय वर्ष २६ रा.विलासनगर,माळवाडी, शिरोली पुलाची ता.हातकणंगले यास कोल्हापूर जिल्हयाचे हद्दीतून एक वर्ष कालावधीसाठी हद्दपार केल्याचा आदेश आज मंगळवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता पारीत केले आहेत.गुन्हेगारांची दहशत मोडून काढून त्यांचे समुळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभूमीवर सदरची हददपारीची कारवाई करण्यात आलेली आहे.शिरोली MIDC पोलीस ठाणेच्या हद्दीतील रोहित शहाजी सातपुते याचे विरुध्द गर्दी,मारामारी, गंभीर,दुखापत,बेकायदेशीर जमाव जमवणे,दरोडा, नुकसान करणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.लक्ष्मीपुरी पोलीस ठाणेच्या हददीमध्ये हद्दपार सातपुते यांने दगड कांठ्यांनी गाडीच्या काचा फोडून नुकसान करुन मारहाण केलेने गुन्हा दाखल आहे.सदर गुन्हेगाराविरुध्द सन २०२२ ते २०२४ मध्ये शरिराविरुध्द व मालमत्ते विरुध्द गंभीर गुन्हे दाखल आहेत.त्यामुळे गुन्हेगारा विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अन्वये शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी,करवीर विभाग व पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांचे मार्फतीने उपविभागीय दंडाधिकारी, इचलकरंजी विभाग यांना प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार उपविभागीय दंडाधिकारी,इचलकरंजी यांनी गुन्हेगाराविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयाचा व सदयस्थितीचा विचार करुन रोहित शहाजी सातपुते याला कोल्हापूर जिल्हाच्या हद्दीतून एक वर्ष कालावधीसाठी हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.आगामी विधानसभा निवडणुक,सण उत्सव या काळात गुन्हेगारांवर बारकाईने नजर ठेऊन गुन्हेगारांवर यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी सुजितकुमार यांचे मार्गदर्शनाखाली सुनिल गायकवाड,सहा.पोलीस निरीक्षक,शिरोली एमआयडीसी पोलीसांनी केली.

Spread the love
error: Content is protected !!