शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळमध्ये नव्याने सुरू होत असलेल्या, गोंडस टॉईज बँकेमुळे या परिसरातील गरजू व उपेक्षित मुलांना खेळण्यासाठी खेळणी मिळणार असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होणार आहे.असे प्रतिपादन राधा महिला फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ जयश्री पाटील यांनी केले.
भरणा खेळण्यांचा,परतावा आनंदाचा या उपक्रमांतर्गत रोटरी क्लब ऑफ शिरोळचे सदस्य उद्योगपती चिंतामणी गोंदकर आणि प्राजक्ता गोंदकर यांनी शिरोळमध्ये गोंडस टॉईज बँक सुरू केली.यामध्ये वापरात नसलेली चालू लहान-मोठी खेळणी या बँकेत जमा करून ही खेळणी उपेक्षित वंचित मुलांपर्यंत पोहोचवून त्यांच्यात खेळण्याचा आनंद पसरविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या गोंडस टॉईज बँकेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी सौ.जयश्री पाटील या बोलत होत्या.उपस्थित मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन आणि फीत कापून गोंडस टॉईज बँकेचा शुभारंभ करण्यात आला. स्वागत व प्रस्ताविकामध्ये चिंतामणी गोंदकर यांनी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.
या समारंभास योग अमृत ट्रस्टच्या प्रमुख नातू मॅडम, रोटरी क्लब ऑफ शिरोळचे अध्यक्ष सुनील बागडी,सचिव डॉ अंगराज माने,खजिनदार दिनेश माने गावडे, रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष तुकाराम पाटील, सचिव मेजर प्रा. के एम भोसले, सदस्य अमित जाधव, उल्हास पाटील, रोटरी क्लब ऑफ शिरोळचे सदस्य नितीन शेट्टी, सचिन देशमुख, युवराज जाधव, लायन्स क्लब ऑफ शिरोळचे सचिव अमोल देशमुख, सदस्य सुनील देशमुख,अभिजीत गुरव यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते.