घराणेशाहीला नेस्तनाबूत करा शरद पवारांचे भर पावसात इचलकरंजीकरांना आवाहन

इचलकरंजी / प्रतिनिधी

साताऱ्याच्या सभेची पुनरावृत्ती इचलकरंजी विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळाली.महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्यासाठी शरद पवारांनी आज शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी दोन वाजून पंधरा मिनिटांनी व्यासपीठावर आगमन झालं.सकाळपासून शरद पवारांचं भाषण ऐकण्यासाठी थांबलेल्या मतदारांनी शरद पवार व्यासपीठावर आल्यावर एकच जल्लोष केला.यानंतर शरद पवार भाषणाला उभे राहिले,यावेळी इचलकरंजीत मुसळधार पावसाला सुरुवात झाली.मात्र, पवारांनी भाषण न थांबवता आलेल्या लोकांना संबोधित केलं.शरद पवारांच्या सभेला हातकणंगले मतदारसंघाचे राजू बाबा आवळे,शिरोळ मतदारसंघाचे गणपतराव पाटील यांच्यासह नागरिकांनी मुसळधार पावसात पवारांचं भाषण ऐकलं.

महायुतीला पराभूत करून महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करा, घराणेशाहीला नेस्तनाबूत करा,असं आवाहन करत शरद पवारांनी सुमारे पंधरा मिनिटं मुसळधार पावसात भाषण केलं.आता पवारांचं हे भर पावसातील भाषण आणि सभा इचलकरंजीत गेम चेंजर ठरणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.भर पावसात उमेदवार व्यासपीठावर शरद पवारांचं भाषण सुरू असताना मुसळधार पावसाला सुरुवात झाली.यावेळी व्यासपीठावरील इचलकरंजी विधानसभेचे उमेदवार मदन कारंडे यांच्यासह शिरोळचे उमेदवार गणपतराव पाटील यांनीही भर पावसात शरद पवार यांच्या सोबत उभारून भाषण ऐकलं.भाषणाला महिलांनी मोठी गर्दी केली होती. “पाऊस आणि माझा तसा काही संबंध नाही.मात्र,भाषणाच्या वेळी पाऊस लागल्यामुळं निकाल चांगला लागेल,” असं शरद पवार म्हणाले.

Spread the love
error: Content is protected !!