उदगांव / प्रतिनिधी
उदगांव (ता.शिरोळ) येथे शिरोळ मार्गावरील गणेश कॉलनीतील सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.सातत्याने मागणी करूनही लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गणेश कॉलनीतील नागरिकांनी बुधवार दि.20 नोव्हेंबर रोजी होणार्या शिरोळ विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय येथील नागरिकांनी घेतला आहे.अशा आशयाचा फलकही आज उदगांव-शिरोळ मार्गावर लावण्यात आला आहे.उदगांव येथील शिरोळ मार्गावर महावीर कॉलनी,गणेश कॉलनी यासह अनेक उपनगरे आहेत.येथील सांडपाणी निचरा होत नाही.हे पाणी रस्त्यावर साचत असल्याने नागरिकांना डेंग्यू,मलेरिया यासह अन्य साथीच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.वारंवार लोकप्रतिनिधींना सांगूनही याकडे दुर्लक्ष केले आहे.शिवाय येथील नागरिकानी लोकप्रतिनिधींचे उंबरे झिजवले तरी सांडपाण्याच्या गटार उभारली नाही.परिणामी नागरिकांना आजारांना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे येथील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचा फलकही लावला आहे.शिवाय विजय चौगुले,विजय पाटील,वकील पाटील,महेश पोतदार,अक्षय शिंदे, अश्विनी मडीवाळ,ललिता चौगुले,प्रतिभा पाटील, प्रिया पाटील,स्वाती पोतदार,सुवर्णा रुपणूर, अश्विनी मोरे,मनिषा मोरे,सुनिता मादनाईक, समीक्षा तावरे, निता चौगुले यांच्यासह नागरिकांनी लोकप्रतिनिधींविरोधात घोषणा देऊन मतदानावर बहिष्कार टाकला आहे.