अब्दुललाट / प्रतिनिधी
स्वतःला मालक म्हणवून घेण्याची संस्कृती वाढत आहे. समोर बसलेली जनता म्हणजेच देशाचे मालक आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे.हे आमदार स्वतःच्या न्याय हक्कासाठी झटणाऱ्या लोकांच्या कोणत्याही आंदोलनात कोठेच दिसले नाहीत.आंदोलनातून कोणताही मार्ग काढण्याचा कधीच प्रयत्न केला नाही.नुसताच पैसे मिळवायचा उद्योग त्यांनी केला.त्यामुळे आपले काम करणारे सरकार आणण्यासाठी आणि शेती आणि शेतकरी वाचवण्यासाठी गणपतराव पाटील यांना निवडून देऊन विरोधकांचा फुगा फोडा.पाच वर्षांपूर्वी ते म्हणाले होते,आमचं काय चुकलं? पण आता सर्वच मतदार म्हणत आहेत आमचं काय चुकलं ? त्यांना कोणत्याच प्रकारची वैचारिक भूमिका राहिली नसून भाजपाचे धोरणे त्यांना मान्य आहेत का? हे त्यांनी जाहीर करावे असे खुले आवाहन कॉम्रेड आप्पा पाटील यांची सत्ताधाऱ्यांना केलं आहे.