आत्महत्या नसून खून असावा,अनोळखी तरुणांचा मृतदेहाने उडाली खळबळ

Spread the love

तारदाळ / प्रतिनिधी

जयसिंगपूर हातकणंगले मार्गावरील तारदाळ हद्दीमध्ये रेल्वेरूळावर कमरे पासून दोन तूकडे झालेला अनोळखी तरुणांचा मृतदेह आज रविवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आढळून आला.रेल्वे रुळावर मृतदेह म्हणजे आत्महत्या असेल असा तर्क स्थानिक नागरिकांचा झाला मात्र घटनास्थळी मृतदेहाचे दोन्हीपाय बांधलेले व गळा आवळलेला असल्याचे दिसत असल्याने या तरुणांचा खून झाला असल्याचे दिसून येत आहे.घटनास्थळी इचलकरंजी उपविभागीय अधिकारी, शहापूर पोलीस,डॉग स्कॉड,फॉरेन्सीक,समर्थ रूग्णवाहिका व स्वप्नील नरूटे यांनी भेट दिली, घटनास्थळावरून पहाटे 3 ते चार वाजण्याच्या सुमारास मृतदेह रेल्वे रुळावर ठेवला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.अधिक तपास शहापूर पोलीस करत आहेत.दरम्यान सदर मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सूरू आहे.दरम्यान काही माहिन्यापूर्वी तेथेच डोंगरामध्ये असाच बेवारस सडलेला (खून ) झालेला मूत्यूदेह सापडला होता त्यांचा सूद्धा शोध लागला नाही,सकाळी मृतदेहाची माहिती कळाली पण नेहमी प्रमाणे हद्दीचा विषय सूरू झाला नंतर शहापूर पोलीसांनी मृतदेह आयजीएम रुग्णालयात नेले पण तेथील डॉक्टरांनी हातकणंगले प्राथमिक रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला त्यामूळे मरणानंतर सुद्धा मृतदेहाचे हाल होताना दिसत आहे.ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक नागरिकातुन व्यक्त केला जात आहे.तर ऐन दिवाळीच्या भाऊबीज दिवशी मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

error: Content is protected !!