शेतकऱ्यांचा फायदा होणार असेल तर १० पाऊले मागे घेईन – धनाजी चुडमुंगे
सैनिक टाकळी / प्रतिनिधी
चळवळीचा एकच उमेदवार दिल्यास कारखानदारांचा पराभव करता येईल त्यासाठी धनाजी चुडमुंगे यांनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून विचारणा होत आहे.मी अर्ज मागे घेऊन शेतकऱ्यांचा फायदा होणार असेल व ती एक अट त्यांनी मान्य केल्यास मी माघार घेतो अशी भूमिका आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी घेतली आहे.
विधानसभा निवडणूक निमित्ताने गुरुवारी सैनिक टाकळी येथील मारुती मंदिर चौकात झालेल्या सभेत चुडमुंगे बोलत होते.सभेच्या अध्यक्षस्थानी संभाजी पाटील होते स्वागत डॉक्टर शिवाजी पाटील यांनी केले.यावेळी चुडमुंगे पुढे म्हणाले राजकारण हा आमचा अजेंडा नाही आम्ही शेतकऱ्यांच्या गोर गरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी निवडणूक आखाड्यात उतरलो असून जर आमची उमेदवारी मागे घेतल्याने शेतकऱ्यांना जादा दर मिळनार असेल तर आम्ही माघार घेतो असे त्यांनी या सभेत बोलून दाखवले असले तरी जर राजू शेट्टी व उल्हास पाटील यांनी ही अट मान्य केली नाही तर निवडणूक लढवायची काय असा सवाल उपस्थित शेतकऱ्यांना धनाजी चुडमुंगे यांनी विचारला असता सर्व शेतकऱ्यांनी हात उंचावून निवडणूक लढायची म्हणून त्याला मान्यता दिल्याने आता स्वाभिमानी च्या राजू शेट्टी यांची एक अर्थाने कोंडी झाली आहे.3 तारखेच्या उदगाव येथील सभेपर्यंत राजू शेट्टी व उल्हास पाटील यांनी निर्णय द्यावा असेही या सभेत ठरले आहे.
टाकळी प्रचार सभेत आज पहिल्याच दिवशी
1 लाख 2 हजार 500 रुपये शेतकऱ्यांनी निवडणूक खर्चासाठी देणगी जाहीर केली असून एक नोट एक वोट या तत्वाने पुन्हा शिरोळ तालुक्यात शेतकऱ्यांचे खमकं नेतृत्व तयार करण्याचा निर्धार करण्यात आला. कारखानदारा विरोधात स्वाभिमानी आणि अंकुश संघटना एकत्र येऊन लढायचं ठरल्यास उमेदवारी मागे घेऊ पण त्यासाठी एक अट धनाजी चुडमुंगे यांनी घातली आहे ती अट अशी आहे की राजू शेट्टी,उल्हास पाटील यांनी स्टॅम्प पेपर वर यावर्षी 3700 रुपये पहिली उचल आणि गत हंगामाचा दुसरा हप्ता 200 रुपये घेतल्याशिवाय यावर्षीचे ऊस आंदोलन मागे घ्यायचे नाही असे शिरोळच्या तक्तात समोर येऊन लिहून द्यावे लागणार आहे.सभेच्या अध्यक्षस्थानी संभाजी पाटील होते स्वागत डॉक्टर शिवाजी पाटील यांनी केले तर उदय होगले दिपक पाटील यांची यावेळी भाषणे झाली आभार विनोद पाटील यांनी मानले.माजी सैनिक संघटनेचे बी.एस.पाटील, आंदोलन अंकुशचे राकेश जगदाळे अमोल गावडे दत्तात्रय जगदाळे यांच्यासह सभेला टाकळी व परिसरातील शेतकरी मोठया संख्येने हजर होते.