२५ नोव्हेंबरला श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशहा उरूस

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळचे ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुस हा कार्तिक पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या सोमवार पासून म्हणजेच सोमवार दि. १८ नोव्हेंबर २०२४ पासून ते गुरुवार दि. २१ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत होणार होता पण या कालावधीत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने हा उत्सव व उरूस सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर ते गुरुवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ अखेर साजरा करण्यात येणार असल्याची माहिती शिरोळ पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव आणि श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशाह उरूस समितीचे अध्यक्ष केतन चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशहा उरूस साजरा करणे दिनांक १८ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत अपेक्षित आहे. तथापी सदर कालावधीमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आदर्श आचारसंहिता कार्यरत असणार आहे.यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे आवश्यक आहे.यामुळे सदरचा उत्सव / उरूस एक आठवडा पुढे ढकलणे आवश्यक झालेले आहे.तरी सदरचा उत्सव / उरूस सोमवार दि. २५ नोव्हेंबर २०२४ पासून ते गुरुवार दि. २८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत दरवर्षीच्या प्रथा,रूढी परंपरेनुसार साजरा करणेचे निश्चित केलेले आहे. तरी याप्रमाणे सर्व भाविक, नागरिक यांनी नोंद घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव व श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस समितीचे अध्यक्ष केतन चव्हाण यांनी केले आहे.

Spread the love
error: Content is protected !!