शिरोळ येथील काळे मळा येथे 6 फूट लांबीची मगर आढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान शहरातील प्राणी मित्रांनी या मगरीच्या जेरबंद करून कोल्हापूर वनविभागाच्या ताब्यात दिली.शिरोळ नांदनी मार्गावर असणाऱ्या काळे मळा परिसरात दगडू काळे यांच्या घराच्या मागील बाजूस रविवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आवाज येत असल्याचे कळाले त्यानंतर राहुल काळे याने जवळ जाऊन पाहिले असता सहा फूट लांब असणारी मगर यांना दिसली,त्यानंतर राहुल काळे यांने शहरातील प्राणीमित्र अनिल माने,विशाल पाटील,प्रविण इंगळे,तुकाराम पाटील,मालोजीराजे निंबाळकर, राहुल काळे,अतुल माने,साद शेख यांना माहिती दिली.तात्काळ प्राणी मित्रांनी भेट देऊन अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नाने मगरीला जेरबंद करण्यात यश आले.मगरीला जेरबंद केल्यानंतर कोल्हापूर वनविभागास माहिती देऊन रात्री उशिरा वनविभागाच्या ताब्यात दिली असल्याची माहिती प्राणीमित्र अनिल माने यांनी दिली.