सौ.स्नेहा देसाई यांना विधानसभेची उमेदवारी द्यावी बहुसंख्य महिलांची मागणी

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

महाराष्ट्रात लाडकी बहिण योजनेचा गाजावाजा मोठ्याप्रमाणात सुरू आहे मात्र महाराष्ट्रातील बालिका, युवती व महिला यांच्यावर सातत्याने अन्यायकारक घटना घडत आहेत. महाराष्ट्रात पुरोगामी विचाराचा वारसा शाहू,फुले,आंबेडकर यांच्या नावाने जप केला जातो मात्र महिलांना म्हणावे तसे महत्त्वाचे स्थान मिळत नाही ही दुर्दैवी बाब आहे.बदलापूर सारख्या घटनामुळे महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणामध्ये नाहक बदनामी झालेली आहे.जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,ताराराणी यासारख्या कर्तबगार महिलांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो मात्र सध्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्रात महिलांचे जिने नकोसे झालेले आहे अशी परिस्थिती निर्माण होत आहे.महाराष्ट्रातील पुरोगामी विचाराचा वारसा आणि वसा जपण्यासाठी व महिलांचे प्रश्न विधिमंडळामध्ये सक्षमपणे मांडण्यासाठी महिलांना प्राधान्याने उमेदवारी मिळणे ही काळाची गरज आहे. महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये विधिमंडळात पाठवणे ही काळाची गरज बनलेली आहे तेव्हा महिलांच्या समस्या प्रभावीपणे विधिमंडळात मांडण्यासाठी महिला आमदारांची गरज आहे.महिला सबलीकरण खऱ्या अर्थाने होण्यासाठी महिलांना जास्तीत जास्त प्रमाणात उमेदवारी देऊन खऱ्या अर्थाने महिलांना न्याय देण्याचे कार्य करावे.शिरोळ तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या तालुकाध्यक्ष सौ.स्नेहा वसंतराव देसाई या पदभार सांभाळल्यापासून महिलांच्या प्रश्नांसाठी,महिला सबलीकरणासाठी,सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक उपक्रम व आंदोलनात सहभागी होऊन महिलांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे. बहुजन समाजाशी असणारी नाळ व पती वसंतराव देसाई यांचे कार्य करण्याची पद्धती पाहिल्यास एक सक्षम पर्याय म्हणून सौ.स्नेहा वसंतराव देसाई यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवणे आवश्यक आहे. तरी महाविकास आघाडी मार्फत शिरोळ विधानसभा मतदारसंघातून सौ.स्नेहा वसंतराव देसाई यांना उमेदवारी मिळावी.अशी शिरोळ तालुक्यातील बहुसंख्य महिलांनी केलेली आहे.

error: Content is protected !!