राष्ट्रसेवा युवक संघटनेच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

राष्ट्रसेवा युवक संघटनेच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील राष्ट्रसेवा युवक संघटना यांचा ४२ वा वर्धापन दिनाचे औचित्य साधत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या वर्धापन दिनानिमित्त करा ओके गीत गायन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये ३० उत्कृष्ट गायकांना निमंत्रित करण्यात आले होते.सर्व स्पर्धकांनी आपल्या सुमधुर आवाजात सादर केलेल्या हिंदी मराठी चित्रपट गीतांनी उपस्थित श्रोत्यांची मनी जिंकली.कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय पाटील होते. तर प्रमुख पाहुणे भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पाटील,माजी उपसरपंच कृष्णात करपे,उपसरपंच बाजीराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव, महादेव सुतार,व्ही.आर.ज्वेलर्सचे दत्तात्रेय डिसले, बाळासाहेब तानवडे,सुकुमार गुमताज ,सुभाष सुतार,डॉक्टर सुभाष पाटील,सदस्य प्रतिनिधी बाळासो पाटील,ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव करण्यात आला.यावेळी महावितरण शाखा पुलाची शिरोली येथे प्रधान तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असणारे अशोक राजाराम कोळी यांचा शिरोलीतील वीज वितरण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ,सन्मानपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.अशोक कोळी यांनी आपल्या सेवेच्या माध्यमातून शिरोलीच्या विकासात व राष्ट्राच्या निर्मितीत हातभार लावल्यामुळे उपस्थित पाहुण्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक दीपरत्न चावरेकर – वाकरे आणि संदीप पोवार कोल्हापूर यांना विभागून देण्यात आला.द्वितीय क्रमांक पुष्पक गवई – कोल्हापूर,तृतीय क्रमांक प्रताप कांबळे – शिरोली तर उत्तेजनार्थ आसमा सय्यद – कोल्हापूर, सचिन कांबळे – कळंबा यांना पारितोषिक देण्यात आले.या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुरज नाईक सर यांनी कामकाज पाहिले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जाधव (आकाशवाणी) यांनी केले.स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब तानवडे,सुभाष सुतार  विनायक शंकरदास,संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले.
Spread the love
error: Content is protected !!