१ कोटी १२ लाख २५ हजार रुपयांच्या आरसीसी गटर्स कामाचे उदघाटन

सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून शिरोळ शहरात कोट्यावधीची विकास कामे केली यापुढे ही आणखी निधी देऊन प्रलंबीत कामे पूर्ण करू असे अभिवचन माजी आरोग्य मंत्री व विद्यमान आमदार डॉ राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिरोळ येथे 50/54 रोड व पूल योजनेअंतर्गत 1 कोटी 12 लाख 25 हजार रुपयांच्या आरसीसी गटर्स बांधणे काम उदघाटन प्रसंगी दिले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील होते.कबनुर,गंगानगर,यड्राव, जांभळी,हरोली, नांदणी,धरणगुत्ती या 31 किलोमीटरवर रस्ताच्या पैकी शिरोळ गावभाग आरसीसी गटर्स कामासाठी आमदार डॉ राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नातून व शिरोळचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या पाठपुराने 1 कोटी 12 लाख 25 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे.या कामाचे उदघाटन रविवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता आरोग्य मंत्री व विद्यमान आमदार डॉ राजेंद्र पाटील-यड्रावकर व माजी नगरसेवक शरद उर्फ बापू मोरे,एन वाय जाधव, जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजयसिंह माने-देशमुख , माजी सरपंच अर्जुन काळे,रामचंद्र पाटील,हाजी बाळासो शेख,सुभाष माळी या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.आमदार यड्रावकर पुढे म्हणाले शिरोळ तालुक्याने मला अपक्ष म्हणून निवडून दिले त्याच्या विश्वासास पात्र राहून गेल्या पाच वर्षात कोट्यावधी कामे पूर्ण केली काही अंतिम टप्यात आहेत.शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या पाठपुराने शहरात विकास कामे पूर्ण झाली आहेत.यापुढे ही विकास कामे करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे अभिवचन दिले.दरम्यान पाटील समाज मंदिर जवळचा रस्ताच्या कामासाठी सहकार्य केल्याबद्दल पाटील समाजाच्या वतीने आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बंटी संकपाळ,धनाजी माळी यांच्यासह नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!