मनपाडळे येथील विविध विकासकामांचा उद्धाटन शुभारंभ आज पार पडला.तसेच अंबपवाडी येथील रस्ता कामाचा शुभारंभही करण्यात आला.या कार्यक्रमाला उपस्थित राहून विकासकामांचे उद्धाटन केले.यावेळी गावकऱ्यांनी अभूतपूर्व असे स्वागत करून सत्कार केला.गावकऱ्यांनी दिलेल्या या प्रेमामुळे मी अक्षरशा भारावून गेलो.ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधा बळकट व्हाव्यात यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे.कारण गाव हा राज्याचा आणि देशाचा कणा आहे.गावचा विकास झाला तर देशाचा विकास होतो. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास करणे हेच माझे ध्येय असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.गावच्या विकासाबाबत गावकऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. तसेच गावची विकासाची दिशा ठरवली.यावेळी नागरिक, महिला भगिंनी,तरूण कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.