बुवाची सौंदत्ती येथील दिग्विजय उर्फ भीमराव अशोक भापकर चंदीगड,पंजाब येथे शहीद

इंगळी / प्रतिनिधी: राजू कोळी

बुवाची सौंदत्ती तालुका रायबाग येथील रहिवासी दिग्विजय उर्फ भीमराव अशोक भापकर (३५) यांचे चंदीगड,पंजाब येथे शहीद झाले आणि शनिवार त्यांच्यावर शासकीय इतमात जन्म

गावी बुवाची सौदती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.भारतीय लष्कराच्या 67 एमईडी रेजिमेंटमध्ये 15 वर्षांपासून सेवा बजावत होते भीमराव भापकर हे लष्कराने आयोजित केलेल्या

स्पर्धेत सहभागी झाले.त्यावेळी त्या खेळताना गंभीर जखमी झाले त्यांना चंदीगड आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले ह़ोते.तरी उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला आणि आज त्यांचे

पार्थिव शरीर गावात येताच त्यांच्या घरी नेण्यात आले.नंतर गावातील प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाच्या आवारात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.यावेळी रायबाग आमदार

दुर्योधन ऐहोळे,सौंदत्ती ग्रामपंचायत अध्यक्ष रामचंद्र काटे,उपाध्यक्ष आझाद ताशिवाले,ओकार आश्रमचे शिव शंकर स्वामीजी,माजी अध्यक्ष ईरगौडा पाटील,कोरे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे,रायबागचे सीपीआय एच

डी मुल्ला यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिकांनी शहीद जवान भीमराव भापकर यांचे दर्शन घेतले.रायबागचे सीपीआय एच.डी.मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली यांनी सुरक्षा व्यवस्था केली होती.

शहीद जवान भीमराव भापकर यांच्या पश्चात आई,वडील, भाऊ,पत्नी व मुलगा दक्ष वय 4 तर मुलगी आराध्या वय वर्षे 2 आहे.दरम्यान वीर जवानाचे पार्थिव गावात येतांच भारत माता की जय चा जयघोष देत,गावातील प्रमुख मार्गावरून

भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत फुलांची उधळण करून, वंदे मातरमचा जयघोष आणि देशभक्तीपर गीते गात सैनिकाला मानवंदना देण्यात आली.नंतर कृष्णा नदीच्या काठावरील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी महार रेजिमेंट बेळगांव सैनिकाच्या वतीने मान वंदना देण्यात आली.यावेळी वीर पत्नी मेघा हिच्याकडे राष्ट्रध्वज तिरंगा देऊन मानवंदना देण्यात आली.सौदती गावात वीर जवानाचे निधनाची बातमी समजताच संपुर्ण गाव शोककळा पसरली होती. गावातील दुकाने,हॉटेल,शाळा, महाविद्यालये बंद ठेवून सर्वांनी अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

Spread the love
error: Content is protected !!